विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, पत्नी अनुष्का शर्माने दिला मुलाला जन्म, काय नाव ठेवलं, जाणून घ्या…

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्का त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये होते.

विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना वडील झाल्याची खुशखबर दिली. विराटने आपल्या मुलाचे नाव अकाय असे ठेवले आहे. विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी तुम्हा सर्वांना आनंदाने सांगू इच्छितो की 15 फेब्रुवारी रोजी आमच्या घरी एक छोटा पाहुणे आणि वामिकाचा लहान भाऊ आला आहे.

या शुभ मुहूर्तासाठी मी तुमच्या सर्व प्रार्थना आणि आशीर्वाद मागतो. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 2021 मध्ये पहिल्यांदा पालक झाले. विराटच्या पहिल्या मुलीचे नाव वामिका आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान शिव निराकार मानले जातात. यामुळे विराट कोहली आणि अनुष्काने आपल्या मुलाचे नाव भगवान शिवाच्या नावावर ठेवल्याचे मानले जात आहे.

दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे विराट कोहली इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. विराटच्या नावाचा संघात समावेश होता, मात्र त्याने अचानक संघ सोडण्याचा निर्णय घेतला.

यानंतर तो तिसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, पण नंतर संघ व्यवस्थापनाने तो संपूर्ण मालिकेतून बाहेर असल्याची माहिती दिली.यादरम्यान विराटचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नव्हता. याबाबत बीसीसीआयने विराट कोहलीच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, अनुष्काने 11 जानेवारी 2021 रोजी वामिकाला जन्म दिला होता. वामिकाच्या जन्मानंतर विराटने अनेकवेळा कुंटूबियासोबत टाईम्स स्पेंड केला आहे. सध्या चाहते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.