Wardha News : वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील आर्वी तालुक्यातील एका गावात रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली आहे. याठिकाणी अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून दारू पाजत एकाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत तपास सुरू आहे.
याबाबत आर्वी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्वी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. सध्या या घटनेत कोण कोण होत याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या घटनेमुळे मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे. रहिवासी १७ वर्षीय मुलीला अशपाक आणि शुभम नामक तरुणांनी कारमध्ये जबरदस्तीने बसवले. तिने आरडा ओरडा करायच्या आतमध्ये तेथून निघून गेले. तिला गावाबाहेरील रस्त्यावर नेत कारमध्येच बळजबरीने दारु पाजली.
तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिने कसेबसे आपले प्राण वाचवून पोलिसांना हा घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तपास देखील सुरू केला आहे. लवकरच या आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक काळे यांनी सांगितले.
या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि आर्वी पोलिसांचे एक अशी दोन पथके आरोपींच्या मार्गावर आहेत. दरम्यान, घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने कुटूंबाला एकच धक्का बसला आहे.