पॉर्न पाहून पती नको तेच करायचा, नशेची गोळी देऊन हैवान व्हायचा, घडली भयंकर घटना

समाजात अनेक घटनांमध्ये स्त्रियांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने पुजाऱ्याच्या मुलीसोबत मैत्री केली. तिला चांगल्या भविष्याचे आमिष दाखवले. यामुळे ती फसत गेली.

याठिकाणी असलेल्यांनी तिला समजावले. त्यानंतर तिने तरुणाला विरोध केला पण त्याने तिच्याशी बळजबरीने लग्न केल्याचे सांगण्यात येते. मात्र नंतर एक भयंकर घटना समोर आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नंतर तो तिला त्रास देऊ लागला. नको ते कृत्य तो आपल्या पत्नीसोबत करु लागला. रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, यश पीडित तरुणीला घेऊन दिल्लीला गेला. तेथे एक खोली भाड्याने घेऊन तो तिच्यासोबत राहू लागला.

असे असताना मात्र त्याने तरुणीला नशेचे पदार्थ द्यायला सुरुवात केली. तो सतत तिच्यासमोर पॉर्न चित्रपट पाहत होता. मुलीला हे विचित्र वाटत होतं. तसेच पॉर्न चित्रपट पाहून यश पीडितेवर अत्याचार करत होता.

दरम्यान, एकेदिवशी यश देवल आणि त्याच्या कुटुंबीयांनी पिडित मुलीला मारहाण केली आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. जोरजोराने आरडाओरडा केला. तिला घरातून देखील बाहेर काढले.

नंतर ती माहेरी गेली, तिने याठिकाणी सगळा घटनाक्रम सांगितला. त्यानंतर एसएसपींच्या आदेशानुसार बारादरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबत तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.