आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी खळबळजनक आरोप केला. त्यांनी मागील वायएसआर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचे म्हटले आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. यानंतर यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
असे असताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने या लाडूंची चाचणी केली. यात लाडू भेसळयुक्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे आता हे एक नवीन प्रकरण समोर आले आहे.
या लाडूत चरबी आणि माशांच्या तेलासह अनेक दूषित घटक आढळले असल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. यामुळे आता याच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने आपल्या अहवालात देवस्थानद्वारे संचालित तिरुपती इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिराचे लाडू बनवण्यासाठी चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर करण्यात आल्याचे म्हटले.
तिरुपती मंदिरातील लाडू आणि अन्नदानमचे नमुने तपासल्यानंतर बोर्डाच्या अहवालात हा मोठा खुलासा झाला आहे. देवाला अर्पण केल्यानंतर हे लाडू प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटले जातात. अनेक भाविक मोठ्या भक्तीने हा प्रसाद घेतात. मात्र यामध्ये अशा प्रकारे गोष्टी आढळुन आल्याने मोठी खळबळ उडाली.
त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या 5 वर्षांत, YSR काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केलं. तिरुपतीच्या लाडू प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरत होते. तिरुपतीचे लाडू हे निकृष्ट घटकांचा वापर करून तयार करण्यात येत होते. लाडू तयार करतांना शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती, असे आरोप केले जात आहेत.
आता आमच्या सरकारच्या काळात लाडू बनवण्यासाठी शुद्ध तुपाचा वापर करण्यात येत आहे. विरोधक याबाबत आवाज उठवत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात हे प्रकरण अजूनच तापण्याची शक्यता आहे.