२०२४ च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित, थेट म्हणाले…

देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे भाजपाप्रणीत सत्ताधारी एनडीए आहे तर दुसरीकडे भाजपाविरोधी पक्षांनी मिळून स्थापन केलेली इंडिया आघाडी आहे. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे कोण जिंकून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाची निवडणूक नेमकी कोणत्या बाजूने झुकणार? याविषयी राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी याबाबत भाष्य केले आहे. त्यांनी राजकीय परिस्थिती कशी राहील, यावर भाष्य करत आहेत.

प्रशांत किशोर यांनी मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षासाठी पूर्व व दक्षिण भारतामध्ये दिलासादायक निकाल लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रामुख्याने पूर्व आणि दक्षिण भारतात भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढतील, असे म्हटले आहे.

तसेच भाजपाला मिळणाऱ्या मतांचे प्रमाणही यावेळी वाढेल. तामिळनाडूसह दक्षिणेकडे भाजपाची मतांची टक्केवारी वाढेल. यावेळी पहिल्यांदाच भाजपाला तमिळनाडूमध्ये दोनअंकी मतांची टक्केवारी गाठण्यात यश येईल, असे प्रशांत किशोर म्हणाले. यामुळे 4 जूनला काय निकाल समोर येणार हे लवकरच समजेल.

तसेच प्रशांत किशोर म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो. यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बिहारमध्येही ते पहिल्या क्रमांकावर असतील. अनेक राज्यात भाजपा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

यामुळे आता दक्षिण भारतात जर भाजपच्या जागा वाढल्या तर त्यांची 400 पार करणे सोप्पे जाणार आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समजेल. याबाबत भाजपने जोरदार रणनीती आखली आहे. काँग्रेसच्या किती जागा वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.