श्री रामाची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळहून आणलेल्या शिळांचे पुढे काय झाले? महत्वाची माहिती आली समोर..

काल श्रीराम भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिजित मुहूर्तावर अयोध्येत श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. यामुळे आज ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली.

डोळ्यावरून पट्टी काढण्यात आल्यानंतर श्री रामलल्लांचे मूखदर्शन सर्वांना घडले. हा सोहळा देशवासीयांसाठी सर्वात आनंदाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा होता. काल दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी सुरू झाला. त्यानंतर रामलल्लांच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली.

दरम्यान, राम मंदिरातील मूर्ती बनवण्यासाठी सुरुवातीला नेपाळमधून शिळा आणण्यात आली होती. मात्र त्यातून मूर्ती बनवली गेली नाही. अयोध्येतील श्रीराम मूर्ती बनवण्यासाठी सुरुवातीला नेपाळमधून शाळीग्राम शिळा अयोध्येत आणण्यात आल्या होत्या.

असे असताना मात्र त्याचा वापर करण्यात आला नाही. नंतर कर्नाटकमधून आणलेल्या शिळामधून मूर्ती घडवण्यात आली. नंतर नेपाळमधून आणलेल्या शिळा श्रद्धापूर्वक मंदिर परिसरात ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे या शिळा देखील त्या परिसरात आहेत.

दरम्यान, काल पंतप्रधान मोदींनी रामलल्लांच्या डोळ्यांत सुवर्णदंडिकेने काजळ लावले आणि त्यांनी रामलल्लाला आरसा दाखवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित आहेत.

अयोध्या या ‘न भूतो न भविष्यती’ सोहळ्यासाठी सजली आहे. शहरात ११ लाख दिवे चेतविले गेले. शहर अडीच हजार क्विंटल फुलांनी सजविण्यात आले होते. सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख होती. अयोध्येत तब्बल २५ हजारांवर जवान तैनात होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरसह बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत, विकी कौशल्य, कॅटरिना कैफ, रणबीर कपूर, अलिया भट्ट, अन्नू कपूर, अभिनेता रणदीप हुडा, दाक्षिणात्य अभिनेते रामचरण संगीतकार आदी अयोध्येत दाखल होते.