कुंभमेळ्यानंतर नागा साधू कुठे जातात? खातात काय? राहतात कुठे? वाचा आजवर माहीत नसलेले रहस्य

आपला देश हा देवदेवतांचा देश म्हणून ओळखला जातो. असे असताना येथील लोकं देखील मोठे धार्मिक आहेत. आपल्याकडे अनेकदा कुंभमेळा किंवा माघमेळा यासारख्या विशेष प्रसंगी दिसणारे नागा साधु मेळ्यानंतर अचानक गायब होतात. त्यानंतर ते कुठे जातात, हे मात्र कधी समजत नाही.

नागा साधू पवित्र नद्या किंवा तीर्थक्षेत्रे सोडून इतरत्र क्वचितच दिसतात. यामुळे याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो. इतर वेळी नागासाधू कुठे राहतात? काय खातात? आपला उदरनिर्वाह कसा करतात याबद्दल अनेकांना उत्सकुता आहे. याबाबत ते देखील जास्त माहिती सांगत नाहीत.

नागा साधु यांचं जग खूपच रहस्यमय असतं. संपूर्ण शरीलाल भस्म फासलेले, मोठमोठ्या जटा असलेले ईश्वरभक्तीत तल्लीन राहणारे नागासाधु शक्यतो डोंगर, जंगलं, गुफा किंवा प्राचीन मंदिराता राहतात. मोठा जप आणि त्याग ते करतात.

ज्या ठिकााणी सामान्य लोकांची वर्दळ नसते अशा ठिकाणी ते एकांतात राहतात. निर्वस्त्र राहत असल्यामुळे त्यांना नागासाधु असलं म्हटलं जातं. नागासाधु आपला बराचसावेळ तपस्येत घालवतात. मात्र त्यांना केवळ शांतता हवी असते.

कुंभमेळ्या व्यतिरिक्त ते सामान्य लोकांसमोर येत नाहीत. भिक्षा मागून किंवा जंगल-डोंगरदऱ्यात राहाणारे नागासाधु कंदमूळं खाऊन ते आपलं पोट भरतात. त्यांच्या आयुष्यात जास्त अपेक्षा नसतात. केवळ देवाचे नामस्मरण हा एकच मार्ग त्यांच्या आयुष्यात असतो.

तसेच अनेक दिवस उपाशी राहण्याची त्यांची क्षमता असते. नागासाधु आपला सर्व प्रवास हे पायी आणि शक्यतो रात्रीच्या वेळी करतात. ते कोणत्याही आरामदायी वस्तूंचा वापर करत नाहीत. आपले संपूर्ण आयुष्य ते यासाठीच खर्ची करत असतात.

ते जमिनीवरच झोपतात. नागा साधूंचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या या धुनीजवळच व्यतीत होते. ते प्रवासात असताना धुनी सोबत नसते, परंतु एखाद्या ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर पहिले काम ते धुनी पेटवण्याचे काम करतात, त्यांनी मोठा त्याग केलेला असतो.