२०२४ला महाराष्ट्रात कोण जिंकणार? ताज्या सर्व्हेच्या निकालांनी मविआ अन् महायुती दोघांचीही उडवली झोप

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रात राजकीय तापमान वाढले आहे. येथे नुकत्याच शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत चुरशीची लढत अपेक्षित आहे. सध्या महाराष्ट्रात दोन आघाड्या आहेत, एक एनडीए आणि दुसरी महाविकास आघाडी.

दोघांमध्ये निकराची लढत होईल, असा अंदाज आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात एक मोठी बाब समोर आली आहे. सर्वेक्षणात विचारण्यात आले होते की, आज महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली, तर कोणाला किती जागा मिळतील? ज्यावर लोकांनी आपले मत मांडले.

सर्वेक्षणात एनडीए आघाडीचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. एमव्हीए आघाडीबाबत बोलताना त्याचा राज्यात फायदा होण्याची अपेक्षा आहे. जाणून घ्या सर्वेक्षणात कोणाला किती जागा मिळाल्या.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. भाजपला 32%, शिवसेना (शिंदे गटाला) ७%, राष्ट्रवादी (अजित पवार गटाला) ५%, काँग्रेसला १६%, शिवसेना (UBT ला) १६%, राष्ट्रवादी (शरद पवार गटाला) १४%, इतरांना ११% मते मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील 4४८ जागांपैकी भाजपला 20 जागा शिवसेना (शिंदे गटाला) २ जागा, राष्ट्रवादी (अजित पवार गटाला) २ जागा, काँग्रेसला ९ जागा, शिवसेना (UBT ला) ९ जागा, राष्ट्रवादी (शरद पवार गटाला) ४ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला २४ जागा आणि एनडीएला २४ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भाजपच्या आता २३ जागा आहेत. २० मिळाल्या तर त्यांना 3 जागांचे नुकसान होणार आहे. शिवसेना शिंदेगटाकडे आता 10 जागा आहेत. २ जागा मिळाल्यास त्यांचे ८ जागांचे नुकसान होणार आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडे २ खासदार आहेत. त्यांना ४ जागा मिळाल्यास २ जागांचा फायदा होणार आहे.

कॉंग्रेसला ८ जागांचा फायदा होऊन त्यांच्या ९ जागा होतील. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ५ जागांचा फायदा होऊन त्यांच्या ११ जागा होतील. राष्ट्रवादी (शरद पवार गटाला ४ जागांचा फायदा होऊन त्यांच्या ४ जागा वाढतील. सर्वेतील या निष्कर्षांनुसार महाराष्ट्रात दोन्ही आघाड्यांचे बलाबल समान राहील