Baramati Crime : धक्कादायक! बारामतीच्या लॉजमध्ये महिलेचा खून; हत्येचे कारण ऐकून पोलीसही चक्रावले

Baramati Crime : बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केल्याचे समोर आले आहे. ही घटना बारामती शहरातील सिनेमा रोड येथील एका प्रसिद्ध लॉजमध्ये घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा विनोद बनसोडे (वय 36 रा. सोनवाडी ता. दौंड जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या वडिलांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांचे नाव महादेव धोंडीबा सोनवणे (वय. 58 रा. सोनवाडी ता. इंदापूर जि. पुणे.) असे आहे.

रविवारी (दि. 4) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील सिने रोडवर असणाऱ्या एका लॉज मध्ये एका महिलेचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर सदर महिलेचा खून तिच्याच पतीने केल्याचे समोर आले आहे. मृत महिलेच्या पतीचे नाव विनोद गणेश भोसले (रा. वी विंग रुम नं.2 म्हाळसाई कृपा आप्पा शास्त्री नगर कोपर रस्ता डोंववली) आहे. तपासा दरम्यान विनोदनेच पत्नीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी विनोदने पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या खून केल्याचे समोर आले आहे. रात्री उशिरा दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती विनोद भोसले विरुद्ध भावी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. तसेच तपासासाठी अनेक पदके रवाना झाली आहेत.

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विनोद भोसले च्या विरोधातील तक्रारीचा पुढील तपास पंकज देशमुख पोलीस अधिकारी पुणे ग्रामीण, संजय जाधव अप्पर पोलीस अधिक्षक, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चेक व इतर अधिकारी या घटनेचा पुढील तपास करत आहेत.