---Advertisement---

प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत म्हणून बाईंनी शिक्षा केली, चिमुकल्याचा जीव गेला, शाळेत काय घडलं?

---Advertisement---

ओदिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील कुआखियामधील बहादलपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षिकेने केलेल्या शिक्षेमुळे एका शाळकरी विद्यार्थ्याचा जीव गेला आहे. त्याला उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. यामुळे ही घटना घडली आहे.

या उठाबशा काढताना विद्यार्थी अचानक कोसळला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

शिक्षिकेने त्याला वर्गात काही प्रश्न विचारले होते. असे असताना मात्र त्याला उत्तरं रुद्रला देता आली नाहीत. यामुळे शिक्षा म्हणून त्याला गुडघ्यावर बसण्यास सांगितले. तसेच त्याला उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. यामुळे त्याला कसेतरी वाटू लागले.

त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याचा जीव वाचू शकला नाही. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रुद्र नारायण सेठी नावाचा विद्यार्थी सनोराली नोडल यूपी शाळेत शिकायचा.

दरम्यान, घटनेबद्दल समजताच रसूलपूरच्या अतिरिक्त ब्लॉक शिक्षा अधिकारी प्रभंजना शाळेत पोहोचल्या. त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. याबाबत तपास करून कारवाई केली जाईल अशी माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, तीन-चार उठाबशा काढताच रुद्र पडला. याची माहिती त्याच्या कुटुंबाला फोनवरुन देण्यात आली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती इतर विद्यार्थ्यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---