तुरुंगात शिक्षा भोगत असताना राजपाल यादवने केले ते काम, पोलिसही झाले इम्प्रेस! नेमकं केलं तरी काय?

राजपाल यादव हा एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने इंडस्ट्रीत आपल्या विनोदी अभिनयाने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. सिनेमात राजपाल याजवचा सीन चालू असेल तर प्रेक्षक खळखळून हसतात.

असे असताना वैयक्तिक आयुष्यात त्याला बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागले होते. राजपाल यादवने ५ कोटी रुपयांच्या कर्ज थकवल्यामुळे २०१८ मध्ये त्याला तीन महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली. याबाबत त्याने स्वतः माहिती दिली आहे.

तुरुंगात असताना त्याने पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सोबत असलेल्या कैद्यांसाठी कार्यशाळा घेतली होती. लोक कलेशी जोडले जावेत, कलाप्रेमी व्हावे, हा यामागचा उद्देश होता. ज्यांना काही करण्याची इच्छा नव्हती किंवा जीवनाला दिशा नाही अशा व्यक्तींनी हसत हसत अभिनयाला सुरुवात केली.

तो म्हणाला, तुरुंग अधिकारी माझ्या उत्साही व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी माझे कौतुकही केले. जेव्हा मी तीन महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर पडत होतो, तेव्हा तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मला एक ऐवजी दोन प्रमाणपत्रे दिली.

यामध्ये म्हटले होते की, आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यात तुमच्यासारखे कोणी पाहिले नाही. आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळाली. आम्हाला वाटलेले की आम्ही रोज तुमच्याकडून तक्रारी ऐकू पण या तीन महिन्यांत तुम्ही या भिंतींना जीवदान दिले आहे.

दरम्यान, राजपाल यादव यांचे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. एक हसमुख कलाकार आणि त्यांची कामे देखील तशीच असतात. यामुळे ते अल्पवधीत लोकप्रिय झाले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार देखील देण्यात आले आहेत.