Yavatmal Crime News: बापलेकाच्या नात्याला काळीमा! दारूसाठी तीन वर्षांचं पोटच पोरगं विकलं, मित्रांसोबत केली पार्टी

Yavatmal Crime News: यवतमाळ जिल्ह्यातून काळीज चिरणारी घटना समोर आली आहे. बाप हा आपल्या मुलाचा रक्षक असतो. तो आपल्या मुलाचे संरक्षण करतो. परंतु, यवतमाळ जिल्ह्यातील एका जन्मदात्या बापाने दारूसाठी स्वत:च पोरग विकल आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

झालं असं की, पती आणि पत्नीचे वाद झाल्यामुळे ते दोघे वेगळे राहत होते. तर त्यावेळी तीन वर्षीय चिमुकला आपल्या वडिलांसोबत राहत होता. त्या मुलाची आई एकटीच राहत होती. या काळात पीडित मलाचा बाप श्रावण देवकर प्रचंड व्यसनाच्या आहारी गेला आणि दारूसाठी मुलाला विकले.

या प्रकरणी पोलिसांनी बाप श्रावण दादाराव देवकर (३२) आणि चंद्रभान देवकर (५५) यांना अटक केली आहे. तर, बाळाला खरेदी करणाऱ्या निर्मल येथील कैलास लक्ष्मण गायकवाड (55) वर्ष रा. गांधी नगर आर्णी आणि बाल्या गोडांबे रा. महागाव कलगाव ता. दिग्रस असे दोघे फरार आहे. पोलिस यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण देवकर याला दारूचे व्यसन आहे. त्याला दारूसाठी पैसे लागत होते. त्यामुळे त्याने आपल्या तीन वर्षीय मुलाला तेलंगणातील निर्मल येथील कैलास गायकवाड याला विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने चंद्रभान देवकर याच्या मदतीने बाळाला निर्मलला नेले. तेथे त्यांनी बाळाला कैलास गायकवाडला विकले.

बाळाची आई संगीता देवकर हिला तिचा मुलगा बेपत्ता झाल्याची खबर मिळताच तिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना बाळाला निर्मलला विकल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मुलाचा बाप आणि आनखी एक व्यक्तीला अटक केली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना निंदनीय आहे. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील सदस्यांना किती मोठे धोके निर्माण होतात हे या घटनेतून दिसून येते.