Yavtmal News : उपचाराच्या बहाण्याने जवळीक वाढवली अन् ५० वर्षीय भोंदूबाबा २२ वर्षीय तरुणीला घेऊन पळाला…

Yavtmal News : यवतमाळ मधील नेर तालुक्यातील एका गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी उपचाराच्या बहाण्याने मुलीशी जवळीक साधून तिला जत्रेला घेऊन जातो, असे तिच्या घरच्यांना सांगून महाराज गेले ते परत आलेच नाही. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

वाट पाहून मुलीच्या पालकांनी नेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल केला असून मुलीचा व महाराजाचा शोध सुरू केला आहे. या घटनेने मात्र सगळेच हादरले आहेत. प्रकाश नाईक महाराज असे त्यांचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तरुणीला डोकेदुखीमुळे वेदना होत असे. तिच्या घरच्यांनी अनेक उपचार केले पण आराम पडत नव्हता. नंतर तिच्या बहिणीलाही त्रास होऊ लागला. यामुळे मुलींच्या वडिलांनी प्रकाश जनार्दन नाईक महाराज यांच्याकडे ते घेऊन गेले.

दरम्यान, महाराजांनी उपचारदरम्यान मोठ्या मुलीला आपल्या प्रेमजाळ्यात ओढले. घटनेदिवशी प्रकाश महाराज मुलीच्या घरी कार घेऊन आले. लाखनवाडीच्या जत्रेला घेऊन जातो म्हणून तरुणीला घेऊन गेले.

नंतर महाराज परत आलेच नाहीत. मुलीच्या वडिलांनी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मोबाइल बंद आढळला. शेवटी मुलीच्या वडिलांनी नेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलीस सध्या त्यांचा तपास करत आहेत.

पोलिसांनी आरोपी प्रकाश नाईक महाराज याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मुलीच्या घरच्यांना एकच धक्का बसला असून पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी पथके तयार केली आहेत.