तुम्ही OYO पण बंद केलेत, आम्ही कुठे जायचं? बागेत छापा टाकणाऱ्या भाजप आमदाराला कपलने झापलं..

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील वैशाली नगरमध्ये एक आगळा वेगळा प्रकार समोर आला आहे. येथील आमदार रिकेश सेन त्यांच्या कामाच्या पद्धतीसाठी चर्चेत असतात, आता देखील ते चर्चेत आले आहेत. त्यांच्याकडे कोणतीही तक्रार आली की ते यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात.

आता या परिसरात असलेल्या नेहरु नगरमधील बागेत प्रेमी युगुलं अश्लिल चाळे करत असल्याची तक्रार सेन यांना मिळाली होती. त्यानंतर सेन यांनी बागेत छापा टाकला. यावेळी त्यांचा प्रेमी युगुलांशी वाद झाला. याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावेळी आमदारांनी या कपल्सला झाडायला सुरुवात केली, ते म्हणाले, अभ्यासावर लक्ष द्या. तेव्हा तिथे असलेल्या एका तरुणाने देखील यावेळी आमदारांना सवाल केला आहे. आम्ही कुठे जायचं, असा प्रश्न त्याने आमदार सेन यांना विचारला. तुम्ही oyo देखील बंद केले.

यामुळे आम्हाला एकांत कसा मिळणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी तरुणी देखील बोलू लागल्या. प्रेम करणं, लपूनछपून भेटणं कित्येक वर्षांपासून चालत आलेलं आहे. घरात पालक असतात, बाहेर तुम्ही, असेही तरुणी म्हणाली.

यावर आमदार म्हणाले, बगिच्यात भेटू नका, येथे राहणाऱ्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. बागेत येणारी अनेक प्रेमी युगुलं अश्लिल चाळे करतात. बागेत चालण्यासाठी येणाऱ्या महिलांना याचा त्रास होतो. इथलं वातावरण खराब होतं, अस आमदार म्हणाले.

दरम्यान, आमदार कारमधून उतरले, एकेका कपलजवळ पोहोचले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोबाईलमध्ये याचे विडिओ काढले, यामुळे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.