1 जानेवारीपासून बंद होणार तुमचा Paytm-GPay UPI आयडी, जाणून घ्या कारण…

गेल्या काही वर्षात UPI पेमेंटचा ट्रेंड खूप वाढला आहे. सगळं काही ऑनलाइन झालं आहे. अगदी घरबसल्या आता सगळ्या गोष्टी होत आहेत. यामुळे कुठे बाहेर जाण्याची देखील गरज नाही. सध्या असे अनेक लोक आहेत ज्यांनी UPI आयडी बनवला आहे, पण कधीही UPI पेमेंट केले नाही.

असे असताना आता 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. NPCI ज्यांनी गेल्या एका वर्षात एकही UPI व्यवहार केला नाही, त्यांचा UPI आयडी ब्लॉक केला जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत माहिती अशी की, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, आता सर्व बँका आणि Paytm, PhonePe, Google Pay सारख्या थर्ड पार्टी अँप त्या UPI आयडी निष्क्रिय करतील, ज्यांनी गेल्या 1 वर्षात कोणताही व्यवहार केलेला नाही.

याबाबत तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा तुमच्या मोबाइल नंबरवर मेसेज येईल. तो UPI आयडी कोणत्या तारखेपासून ब्लॉक केला जाईल, हे तुम्हाला सांगितले जाईल.
तुमचा UPI आयडी बंद होणार आहे, असा मेसेज किंवा ईमेलद्वारे तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर काय करणार याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

तुम्ही फक्त UPI पेमेंट केले तरी तुमचा UPI आयडी ब्लॉक होणार नाही. जर तुम्ही UPI पेमेंट केले नाही आणि तुमचा UPI आयडी ब्लॉक झाला असेल, तर तुम्हाला नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात.

दरम्यान, नवीन वर्षात अनेक नवीन बदल होणार आहेत. यामुळे सध्या याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. नवीन वर्षात ज्या गोष्टी बदलणार आहेत. त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनात देखील बदल होऊ शकतो.