काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुकीबाबत घोषणा केली. जम्मू – काश्मीरमध्ये विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. याबाबत भाजपने जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उमेदवारांची नावं जाहीर केली होती. मात्र ती रद्द करण्यात आली आहेत.
भाजपने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये एकूण ४४ उमेदवारांची नावं होतं. जम्मू – काश्मीरमधील वेगवेगळ्या जागांसाठी त्यांना तिकीट, उमेदवारी देण्यात आली होती. पण भाजपने उमेदवारांची नावं जाहीर केल्यानंतर दोन तासात ही यादी मागे घेतली. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत नव्या बदलांसह पुन्हा नव्याने उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी याबाबत आढावा घेतला आहे. काही उमेदवारांचे अंदाज विरोधात गेल्याने याबाबत यादी माघार घेतल्याची माहिती आहे.
दरम्यान, बैठकीनंर पुन्हा नवी यादी जाहीर झाली आहे. ४४ उमेदवारांची पहिली यादी मागे घेतल्यानंतर भाजपकडून तासाभरात नव्याने १५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अनेकांचा पत्ता कट करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आज सकाळी भाजपकडून जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली होती. दिल्लीत झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ४४ उमेदवारांची नावे अंतिम केली होती. मात्र त्यामध्ये अचानक बदल करण्यात आला.
ही यादी जाहीर झाल्याच्या केवळ दोन तासांत दुपारी १२ वाजता ही यादी परत मागे घेण्यात आली. मागे घेतलेल्या उमेदवारांच्या नावांच्या यादीत बदल केले जाणार असल्याचे बोललं जात आहे. यामुळे याठिकाणी कोणाची सत्ता येणार हे येणाऱ्या काळातच समजेल. याठिकाणी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.