ज्या व्यक्तीला फोनवर शहाजीबापू म्हणाले, काय झाडी काय डोंगर, त्यालाच 5 कोटींसह पकडले, उडाली खळबळ

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता राज्यात आचारसंहिता लागली असताना पुणे पोलिसांना एक मोठं घबाड सापडलं आहे. पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यामुळे याची चौकशी सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी सोमवारी दुपारपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला होता. याबाबत पोलिसांनी पैसे ताब्यात घेतले आहेत.

याठिकाणी संध्याकाळी सहाच्या सुमारास एक संशयित वाहन टोल नाक्यावर आले. यावेळी या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात पोलिसांना रोख रक्कम असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी संबंधित वाहनातील रोख रक्कम जप्त केली. यामुळे मोठी खळबळ उडाली.

खेड शिवापूर टोलनाक्यावर जप्त करण्यात आलेली रक्कम ज्या गाडीमधे दडवण्यात आली होती. त्या गाडीमध्ये असलेल्या या चार व्यक्ती आहेत. या चार जणा़ंची नावे खेड शिवापूर पोलीस चौकीच्या स्टेशन डायरीमधे नोंद करण्यात आली आहेत. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यातील रफिक नदाफ नावाच्या व्यक्तीने शहाजीबापू पाटील यांना गुहावटीला असताना फोन केला होता. त्याच्याशी बोलतानाच शहाजी बापूंनी ‘काय झाडी काय डोंगार’ असा उल्लेख केला होता. तर यातील सागर पाटील हा शहाजी बापूंचा नातेवाईक आहे. यामुळे आता चौकशी केली जात आहे.

दरम्यान, सध्या विधानसभा निवडणूक जवळ आली असून निवडणूक आयोगाने काही ठोस निर्णय घेतले आहेत. यामुळे येणाऱ्या काळात देखील अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.