ताज्या बातम्या

Vikas Jadhav : अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने ठेवले शारीरीक संबंध, शिंदे गटाच्या बड्या नेत्याला १० वर्षांची जेल

Vikas Jadhav : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षातील उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेल्या विकास जाधव याला उदगीर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

तिन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी विकास जाधववर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे अत्यंत तणावात असलेल्या पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. जाधवने आपले राजकीय वजन वापरून संबंधित मुलीला धमकावले आणि तिच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवले.

ही बाब समजल्यावर तिच्या कुटुंबियांना देखील जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. कुटुंबीय घाबरल्यामुळे पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही, मात्र आरोपीने वारंवार अत्याचार सुरूच ठेवले. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने आपले जीवन संपवल

या घटनेनंतर ३ सप्टेंबर २०२० रोजी वाढवणा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार), ५०६ (धमकी) आणि ३६६ (अपहरण) तसेच पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयाचा निकाल
विकास जाधवला अटक केल्यानंतर काही काळ कारागृहात ठेवण्यात आले, मात्र त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. २१ ऑक्टोबर २०२० रोजी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. २०२२ मध्ये खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि १३ साक्षीदारांच्या तपासणीनंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

सोमवारी उदगीर येथील विशेष अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना जाधवला १० वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.

लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून सुटका
पीडित मुलीच्या मृत्यूनंतर, न्यायालयाने कलम ३७६ अंतर्गत विकास जाधवची सुटका केली. मात्र, एक वर्ष पीडित मुलीशी त्याचे संबंध होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

राजकीय नाते आणि परिणाम
विकास जाधव हा लातूर जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य होता आणि शिवसेना पक्षाकडून त्याची नियुक्ती झाली होती. पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Back to top button