Uddhav Thackeray : उद्धव आणि राज ठाकरेंमधी दुरावा मिटणार? संजय राऊत म्हणाले, ज्यावेळी दोघे भाऊ एकत्र येतात…

Uddhav Thackeray :शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून वेगवेगळ्या राजकीय वाटांवर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू सध्या वारंवार भेटत असल्याने नवे तर्क-वितर्क रंगू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात दोघेही एकत्र आले होते.
त्यानंतर आता शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात पुन्हा एकदा उद्धव आणि राज ठाकरे यांची भेट झाली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या आणि तिघांमध्ये काही काळ संवाद रंगला.
संजय राऊतांचा अप्रत्यक्ष टोला
या वाढत्या भेटींवर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “दोन भाऊ जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आनंदच होतो. अशा भेटीगाठी वारंवार व्हाव्यात. मात्र, महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत कोणी हातमिळवणी करू नये, हेच आमचे म्हणणे आहे.”
राऊत यांच्या या वक्तव्यावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना टोला लगावल्याचे स्पष्ट होते. आता या टीकेला राज ठाकरे काय उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे-राज ठाकरे युतीच्या चर्चांवरही राऊतांचे लक्ष
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी *मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिली होती. मात्र, *या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
राजकीय समीकरणे बदलणार?
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या सततच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे युतीबाबतही चर्चा रंगत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात मोठे घडामोडी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.