Uddhav Thackeray : ठाकरेंनी ‘तो’ फोन घेतला असता, तर दोन पक्ष फुटले नसते, पण आता…; फडणवीसांनी उघडले रहस्य

Uddhav Thackeray : मागील काही दिवसांपासून *शिवसेना आणि भाजपमधील दुरावा वाढत असतानाच, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. *माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय अंतर कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

फडणवीसांचे सूचक विधान

एका मुलाखतीत फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा युती होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट नाही म्हणण्याऐवजी “राजकारणात काहीही घडू शकतं” असं सूचक विधान केलं.

“पाच वर्षांत मी एक गोष्ट शिकलो आहे—कधी कशालाच ‘नाही’ म्हणू नये. कारण राजकारणात काहीही होऊ शकतं. मात्र, सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या पक्षांसोबत कोणतीही युती होणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.

विरोधकांशी चांगले संबंध असल्याचा दावा

फडणवीस यांनी विरोधकांशी कायम संवाद ठेवण्यावर भर असल्याचे सांगितले.
“मी बदला घेण्यासाठी नाही, तर बदल घडवण्यासाठी राजकारणात आलो आहे. त्यामुळे विरोधकांशी कायम चांगले संबंध ठेवतो. मी आणि ठाकरे आजही एकमेकांशी फोनवर बोलतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“ठाकरेंनी माझा फोन उचलला असता तर…”

फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना टोला लगावत,
“जर उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी माझा फोन उचलला असता, तर दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली नसती. मात्र, आता आम्ही एकमेकांचे फोन उचलतो,” असे ते म्हणाले.

भविष्यात नवे समीकरण शक्य?

सध्याच्या घडामोडींवरून भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती मजबूत होत असली तरी, ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील दुरावा कमी होतो आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. फडणवीसांनी सध्या युतीच्या शक्यतेला नकार दिला असला, तरी राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात, असे त्यांनी सूचित केले आहे.