राज्यात गेल्या वर्षभरापासून शिवसेना-भाजप अशी सत्ता होती. पण अजित पवारांनी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अजित पवारांसह ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार सत्तेत आल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या अनेक आमदारांनी नाराजीचा सूर लावला आहे. अजित पवारांमुळे आपल्याला मिळणार मंत्रिपदं आता जाणार असे त्यांना वाटत असल्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
अशातच एक हैराण करणारी माहिती समोर आली आहे. भाजपचे काही मंत्री यामुळे राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपसोबतच एकनाथ शिंदे यांच्याही काही मंत्र्यांना राजीनामा देण्याचे सांगण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
भाजपच्या वरिष्ठांनी भाजपच्या मंत्र्यांना सुचना केल्या आहे. त्यानुसार भाजपच्या दोन-तीन मंत्र्यांना राजीनामा द्यावा असे सांगण्यात आले आहे. त्या मंत्र्यांच्या जागेवर आता नवीन भाजपच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाणार आहे.
वर्षभरापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर असे काही मंत्री आहेत, ज्यांनी प्रभावीपणे काम केलेले नाही. त्यांच्या जागी नवीन आमदारांना मंत्रिपद दिले पाहिजे, अशा सुचना वरिष्ठांनी केल्या आहे. तसेच एका घरात दोन मंत्रिपदं देऊ नये, असेही सांगण्यात आले आहे.
अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी शपथ घेतल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज आहे. दोन आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन बाचाबाची झाल्याचेही समोर आले होते. असे असतानाच शिंदे गटातील दोन-तीन मंत्र्यांची बदली करण्याच यावी, अशा सुचना देण्यात आल्या आहे. पण ते राजीनामा देण्यासाठी तयार नसल्याची सांगण्यात येत आहे.