Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात! अ‍ॅम्ब्युलन्सची ट्रकला धडक, डॉक्टरसह 10 जणांचा मृत्यू…, थरकाप उडवणारी घटना

Beed Accident : बीडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात 10 जणांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या दोन अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. बीड- अहमदनगर महामार्गवर ट्रकला ॲम्बुलन्सने पाठीमागून धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला.

तसेच अहमदनगरकडे जात असलेल्या ट्रकला रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच एका जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, सागर ट्रॅव्हल ही बस मुंबई वरून बीडकडे निघाली होती. मात्र बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील आष्टा फाटाजवळ सकाळी सहाच्या दरम्यान ती उलटली. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर आष्टी, जामखेड येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. आष्टा फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

तसेच आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीतील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने धडक दिली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये रुग्णवाहिकेतील डॉक्टरचा देखील समावेश आहे.