Sunil gavaskar : काल झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. यामुळे देशातील चाहते नाराज झाले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वर्चस्व राखले.
यामुळे भारतच हा सामना जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण अंतिम फेरीत दोन्ही विभागांमध्ये भारताची कामगिरी निराशाजक राहिली. यामुळे भारताचा पराभव झाला. भारताला प्रथम फलंदाजी करताना केवळ २४१ धावा झाल्या. यामुळे परिस्थिती बिकट झाली.
भारतीय संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच ऑल आऊट झाला. सुरुवातीला तीन विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांना त्यानंतर यश मिळवता आलं नाही. त्यामुळे भारताच्या हातून सामना निसटला. तीन विकेट गेल्यावर भारत हा सामना जिंकेल, असे अनेकांना वाटत होतं, पण निराशा झाली.
दरम्यान, टीम इंडियाच्या कामगिरीवर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोहली आणि राहुल यांनी भागिदारी रचताना ऑस्ट्रेलियाच्या पार्ट टाईम गोलंदाजांना लक्ष्य केले नाही. त्यांनी चौकार लगावले नाहीत. यामुळे चांगली धावसंख्या झाली नाही.
जास्तीत जास्त एकेरी धावा केल्या असत्या, तरीही भारताला २७० धावांचं लक्ष्य देता आले असते, असे गावस्कर म्हणाले. कोणतीही जोखीम न पत्करता सहजपणे २० ते ३० अधिक धावा करता आल्या असत्या.
त्यामुळे २४१ ऐवजी २६५ ते २७० धावांचे लक्ष्य देता असते, अशी आकडेवारी त्यांनी मांडली. यामुळे इथंच पराभव दिसत होता. 250 पेक्षा जास्त लक्ष ठेवून खेळ केला असता तर आपल्या हातातच विजय आला असता. मात्र या सामन्यात भारताचा पराभव झाला.