ठाकरेंना बसणार मोठा धक्का! निकटवर्तीय 2 आमदार जाणार शिंदे गटात, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला…

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. असे असताना आता मुंबईतील आणखी दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामुळे हे आमदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दोन्ही आमदार पूर्व उपनगरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना शिंदे यांनी सध्या तिथेच थांबा असे सांगितले आहे. यामुळे त्यांचा प्रवेश लांबला असल्याचे सांगितले जात आहे. याआधी उपनगरातील शिवसेनेचे दिलीप लांडे, यामिनी जाधव, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे हे पाच आमदार शिंदे यांच्यासोबत सोबत गेले.

असे असताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले आमदार ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे या आमदारांना सहजासहजी फोडणे शक्य नाही. मात्र प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आता याला भाजपाकडूनही साथ मिळत असल्याचे समजते.

सध्या या आमदार फोडाफोडीमध्ये शिंदे गटाला यशही आले आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांचे बिझनेस पार्टनर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून कौटुंबिक संबंध असलेले जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला.

दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांना ईडीची भीती दाखवून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्यामुळे ते मजबुरीने शिंदे गटात गेल्याचे सांगितले गेले. यामुळे आता दोन आमदारांचा पक्षप्रवेश कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत भाजपने जोरदार फिल्डींग लावली आहे.

मुंबई शहर व उपनगरातील ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे वगळता अन्य 7 आमदारांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यापैकी दोन आमदारांशी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बोलणे झाल्याचेही समजते.