महायुतीला धक्का! राज्यात महाविकास आघाडी मारणार मोठी मुसंडी, लोकसभेचा सर्वात मोठा सर्व्हे आला समोर…

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. या निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक असताना एक मोठा सर्व्हे समोर येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यात महायुतीचे गणित बिघडणार असल्याचे सांगितले जात आहे. ४५ पेक्षा जात जागा जिंकण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

या ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील. राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांना मिळून २८ जागा मिळतील असे सांगितले जात आहे. तसेच यामध्ये महाविकास आघाडीला २० जागा मिळतील, असेही सांगितले जात आहे.

यामध्ये राज्यात भाजपला २२ जागा मिळतील. एकनाथ शिंदे अजित पवार यांना मिळून ६, काँग्रेसला ४ तर ठाकरे आणि शरद पवार यांना मिळून १६ जागा मिळतील असा अंदाज आहे. यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का असेल, असेही सांगितले जात आहे.

अजित पवार यांना ६ तर ठाकरे आणि शरद पवार यांना १६ जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमधून वर्तवला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात भाजपने अनेकांना सोबत घेतले असले तरी याचा फायदा कमीच झाला असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना बसेल असेही सांगितले जात आहे. अजून अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले नाही. यामुळे पुढील काळात अजून बेरीज कमीजास्त होण्याची शक्यता आहे.