माढा लोकसभा निवडणुकीत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवार दिल्याने आता शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप नाराज झाले आहेत.
यामुळे ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. जगताप यांनी लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष अर्ज भरुन निवडणूक लढवणार, असा इशारा दिला आहे. यामुळे आता मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे आता माढ्यात शरद पवार गटासमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर घराण्याने विरोध केला. यामुळे याठिकाणी पहिल्यापासूनच अनेक घडामोडी घडत आहेत. नंतर नाराज मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची कुणकुण लागताच शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप हे नाराज झाले आहेत. आता त्यांनी देखील वेगळी भूमिका घेण्यासाठी दबाव आणला आहे.
पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला शरद पवार यांनी लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करीत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चांवर अभय जगताप चांगलेच संतापले आहेत. यामुळे ते काय भूमिका घेणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, काहीही झालं तर आता आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा जगताप यांनी दिला आहे. त्यांनी माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठी बैठक घेतली. यावेळी त्यांचे समर्थक उपस्थित होते. यावेळी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.