देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना बारामती लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पवार घराण्यातील दोघांमध्ये दुरंगी लढत होत आहे. यासाठी सगळेजण प्रचार करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात ही लढत आहे. याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. यासाठी प्रचार सुरू आहे.
दोघांचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. बारामती लोकसभा मतदार संघात आता आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवार असे या उमेदवाराचे नाव आहे.
पण हे शरद पवार म्हणजे ज्येष्ठ नेते शरद गोविंदराव पवार नाहीत. हे शरद राम पवार आहेत. यामुळे मतदारांची गफलत होऊ शकते. त्यांनी रिक्षावाला संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच प्रचार देखील सुरू केला आहे. यामुळे ते किती प्रभाव टाकणार हे लवकरच समजेल.
त्यांच्या केवळ नावात साधर्म्य असल्यामुळे चर्चा रंगली आहे. शरद राम पवार हे स्वतः रिक्षाचालक असून गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये राहतात. दरम्यान, ते देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा पवार यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. याची चरचा सगळीकडे रंगली आहे. आता अंतिम दिवशी चित्र स्पष्ट होईल.