उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यात देशाचे लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागलं होतं, त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा अंदाज समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे.
याठिकाणी फक्त सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार किंवा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई नव्हती. तर काका शरद पवार विरुद्ध बंडखोर पुतण्या अजित पवार असाही सामना होता. यामुळे याठिकाणी दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आता याठिकाणी सर्व्ह समोर आला आहे.
याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आपली जागा टिकवण्याची शक्यता आहे. याठिकाणी सुप्रिया सुळे यांचा विजय होते असे सांगितले जात आहे. सुळे विजयी झाल्यास हा त्यांचा सलग चौथा विजय असेल.
दरम्यान, एक्झिट पोलनुसार बारामती लोकसभा मतदारसंघात नणंदबाई बाजी मारण्याची चिन्हं आहेत. याठिकाणी सुरुवातीपासूनच शरद पवार यांना सहानुभूती आहे. अजित पवारांनी पक्ष फोडल्याचे लोकांना पटले नाही. सुनेत्रा पवार यांचा पराभव ही अजित पवार यांच्यासाठी मोठी नामुष्की असेल.
शरद पवार यांच्याविरोधात बंड करत अजित पवार यांनी सत्तेत सहभाग घेतला होता. त्यानंतर थेट भगिनी सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात पत्नीलाच रिंगणात उतरवले. आता शरद पवारांना यश आल्यास अजितदादांसाठी मोठा फटका असेल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उद्या मतमोजणी पार पडणार आहे. यामुळे आता सर्व देशाचे लक्ष याकडे लागले असून अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली आहे. सत्ता कोणाची येणार हे काही तासांवर आले आहे. अनेक ठिकाणी लाखोंच्या पैंजा लागल्या आहेत.