राजकारणात पुन्हा भूकंप! नाराज शिंदे गट ठाकरेंकडे परत येण्याच्या तयारीत? शंभुराज देसाईंचे मोठे विधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना-भाजप सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत आलेल्या काही आमदारांनाही मंत्रिपद मिळाले आहे.

या सर्व राजकीय घडामोडींमुळे शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाने महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सोडली असल्याची चर्चा होती. अजित पवार शिवसेनेच्या नेत्यांना निधी देत नव्हते, असे आरोप शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता. पण आता तेच अजित पवार त्यांच्यासोबत सत्तेत असणार आहे.

अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झालेले आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेटून नाराजी व्यक्त करत आहे. अर्थ खातं कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांना दिलं जाऊ नये अशी मागणी आमदारांकडून केली जात आहे.

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी तर जाहीरपणे नाराजी असल्याचे मान्यही केले आहे. आधी एक भाकरी मिळत होती तर आता अर्ध्याच भाकरीवर समाधान मानावे लागणार आहे, तर ज्यांना आर्धीच भाकरी मिळत होती त्यांना पाव भाकरीवर समाधान मानावे लागणार आहे, असे गोगावले यांनी म्हटले होते.

अशात शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. या राजकीय घडामोडीनंतर शिंदे गट पुन्हा ठाकरे गटासोबत जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हैराण करणारे उत्तर दिले आहे.

जर तर वर राजकारण चालत नाही. पण ज्यावेळी ते आम्हाला हाक देतील तेव्हा आम्ही सुद्धा त्यांना साद देऊ. त्यांनी पुढाकार घेतला तर आम्ही सुद्धा त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊ, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे नाराज आमदार पुन्हा ठाकरे गटाकडे जातील असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहे.