गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी राज्यात सर्वांनाच धक्का दिला आहे. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवारांनी 8 खासदार निवडणूक आणले. यामुळे राष्ट्रवादी ही शरद पवार यांची असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आता शरद पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घेण्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये नवीन उमेदवारांना संधी दिली जाईल, पक्ष याबाबत सकारात्मक असल्याचे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, लोकसभेत अजित पवार गटाला अपयश आले. त्यामुळे आगामी विधानसभेत याचा परिमाण होऊ शकतो अशी भीती अजित पवार गटातील आमदारांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे अनेक आमदार आपल्याकडे येतील असे रोहित पवार सतत सांगत आहेत.
अशातच शरद पवार यांनी असे वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. यामुळे आता कोणते आमदार येणार हे काही दिवसांत समजेल. मात्र आतापासूनच सगळे पक्ष कामाला लागले आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विभाजन झाले. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर शरद पवार यांना पत्रकारांनी अनेकदा तुम्ही अजित पवारांच्या आमदारांना पुन्हा पक्षात घ्याल का? असा प्रश्न विचारला.
यावर पवार यांनी अजित पवारांच्या आमदारांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं उत्तर दिले होते. परंतु आता शरद पवार यांनी आपला विचार बदलला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.