Actress: सगळा स्टाफ अचानक निघून गेला, दागिनेही विकावे लागले; मराठी अभिनेत्रीने सांगीतला भयंकर प्रसंग

Actress: प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारेने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिचे लाखो चाहते आहेत. तिने अनेक मालिकामध्ये काम केले आहे. मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि तिचा मुलगा मिहीर पाठारे यांनी काही महिन्यांपूर्वी ठाण्यात “महाराज फास्ट फूड कॉर्नर” नावाचे हॉटेल सुरू केले.

सुरुवातीला हॉटेलला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही कारणांमुळे हे हॉटेल काही दिवसांसाठी बंद करण्यात आले. या काळात सुप्रिया आणि मिहीर यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले.

सुप्रियाने एका मुलाखतीमध्ये या संकटांबद्दल सांगितले. तिने सांगितले की, “हॉटेल बंद असताना स्टाफने अचानक हॉटेल सोडून दिले. मी नवीन हॉटेल सुरू करणाऱ्यांना सल्ला देईन की, तुम्ही एकाच गावातले किंवा एकाच घरातले लोक स्टाफ म्हणून घेऊ नका. कारण ते एकत्र येतात तसेच एकत्र जातात.”

स्टाफने हॉटेल सोडून दिल्यानंतर सुप्रिया आणि मिहीर यांनी स्वतः हॉटेल चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचवेळी मिहीरच्या हाताला दुखापत झाली. मिहीरचा हात पूर्ण भाजला होता. त्यामुळे तो एका हातानं जेवण बनवू शकत नव्हता. त्यामुळे हॉटेल पुन्हा बंद करण्यात आले.

हॉटेल बंद असताना सुप्रिया आणि मिहीर यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. हॉटेलचे भाडे थकले होते. त्यामुळे सुप्रियाने तिचे दागिने विकले. तिने सांगितले की, “हॉटेल बंद असताना कोणाकडून तरी पैसे घेऊन जगणे मला पटत नव्हते. त्यामुळे मी माझे दागिने विकले.”

सुप्रिया पाठारे म्हणाल्या, “अशी वेळ शत्रूवरही येऊ नये. मी या काळात खूप त्रास सहन केला.” आता हॉटेल पुन्हा सुरू झाले आहे. सुप्रिया आणि मिहीर हॉटेल चालवण्यासाठी परत तयार आहेत. त्यांना आशा आहे की, आता हॉटेल चांगले चालेल.