Aishwarya Rai : ऐश्वर्या रायने सोडलं अभिषेक बच्चनचं घर? घटस्फोटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब, धक्कादायक माहिती आली समोर

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा चालू आहेत. पती-पत्नीमध्ये काहीही चांगले चालले नसून हे जोडपे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

घटस्फोटाच्या अफवांदरम्यान आता ऐश्वर्याने पती अभिषेक बच्चनचे घर सोडल्याची बातमी येत आहे. झूमवरील एका रिपोर्टनुसार, असे सांगण्यात येत आहे की, ऐश्वर्या सध्या तिच्या आईसोबत तिच्या माहेरच्या घरी राहत आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील अंतर खूप वाढल्याचा दावा केला जात आहे. दोघेही फक्त त्यांची मुलगी आराध्यामुळे एकत्र राहत होते. अन्यथा, दोन वर्षांपूर्वीच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.

मात्र, अद्याप या जोडप्याच्या बाजूने कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. या सगळ्या दरम्यान अमिताभ आणि ऐश्वर्याने एकमेकांना अनफॉलो केल्याचीही बातमी समोर आली आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि सासू जया बच्चन यांचे नाते काही खास नाही.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघींनी काही वर्षांपूर्वी एकमेकींशी बोलणे बंद केले होते. त्याचबरोबर ऐश्वर्याची मेहुणी श्वेता बच्चनसोबतच्या मतभेदाच्या बातम्या सतत येत असतात. अनेक प्रसंगी दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले आहेत.

मात्र, बच्चन कुटुंबाशी मतभेद असल्याच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण बच्चन कुटुंबासोबत दिसली होती. खरं तर, ‘द आर्चिज’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये अमिताभ बच्चनसह संपूर्ण बच्चन कुटुंब अगस्त्य नंदा यांना सपोर्ट करताना दिसले. यावेळी ऐश्वर्याने बच्चन कुटुंबासोबत क्लिक केलेला आनंदी ग्रुप फोटोही पाहायला मिळाला.