देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघात मोठी लढत होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. यामुळे कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती काकांची की पुतण्याची या प्रश्नाचं उत्तर ४ जूनला मिळेल. या प्रतिष्ठेच्या लढाईसाठी दोन्ही बाजूंनी कंबर कसली आहे. सध्या अजित पवार आणि शरद पवार बारामतीत ठाण मांडून आहेत. यामुळे आता कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही निवडणूक दोन्ही बाजूंसाठी अस्तित्वाची लढाई आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी संपूर्ण कुटूंब मतदार संघात पळत आहे.
तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्यात आलं आहे. यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अजित पवार यांनी याबाबत लक्ष घातले असून भाजप नेत्यांची विरोधकांची जुळवाजुळव केली आहे.
असे असताना बारामतीत भाऊ विरुद्ध बहीण असाही संघर्ष होऊ शकतो. अजित पवारांच्या नावाने बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरण्याच येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आता अजित पवारच उमेदवार असणार का असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
बारामतीमधून सुनेत्रा पवार १८ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून त्यांच्या नावे अर्ज घेण्यात आला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावेही अर्ज घेण्यात आला आहे. यामुळे नेमकं अर्ज कोण ठेवणार यावर सगळं गणित अवलंबून आहे।
या घडामोडी पाहता बारामतीमध्ये अजित पवार डमी उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुनेत्रा पवार यांचा अर्ज काही कारणांमुळे बाद झाल्यास उमेदवारीबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी हा अर्ज असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.