---Advertisement---

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मोठी घोषणा…

---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षात उघड दोन गट पडलेले आहेत. यामुळे लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. असे असताना याठिकाणी उमेदवार कोण असणार याची देखील चर्चा सुरू आहे.

या जागेवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. आता अजित पवार गटातील नेते सुनिल तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर थेट भाष्य केलं. सुनेत्रा पवार याच बारामती मतदारसंघाच्या उमेदवार असतील, असं तटकरे म्हणाले.

यामुळे आता लढत फिक्स मानली जात असून दोन्ही उमेदवार सध्या मतदार संघात दौरे करत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांनी काल ‘शरद पवार विरोधक’ अशी ओळख असलेल्या माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. यामुळे आता त्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत असल्याचे समोर आले आहे.

सुनेत्रा पवार यांनीही आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भोर तालुक्याच्या दौरा दरम्यान सुनेत्रा पवार यांनी थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच राहुल कुल यांच्या दौड येथे देखील त्यांनी भेट घेतली.

भाजपचे जिल्हाअध्यक्ष वासुदेव काळे यांच्या घरी देखील त्या गेल्या होत्या. सध्या बारामती मतदार संघात सुनेत्रा पवार यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यामुळे त्याच उमेदवार असणार हे फिक्स मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---