तुमचा लाडकी बहीण योजनेतील अर्ज बाद होणार, कागदपत्रांची पुन्हा पडताळणी?

महिला सक्षमीकरणासाठी जुलैपासून सुरू झालेली लाडकी बहीण योजना यशस्वी ठरल्याने महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत चांगला लाभ झाला. महायुतीने आता सत्तास्थापनेचा दावा केला असून, 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. यानंतर या योजनेच्या सहाव्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या महिलांच्या खात्यात सहावा हप्ता जमा होण्याची प्रतीक्षा आहे. तरी, सरकारने अद्याप यासाठी कोणतीही तारीख घोषित केलेली नाही. मात्र, योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. योजनेचे अर्ज आणि दस्तऐवजांची पुन्हा तपासणी केली जाणार असून, निकष कठोर करण्यात येणार आहेत.

एकाच कुटुंबातील दोन महिलांपर्यंत लाभ मर्यादित
योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर, सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जदार महिलांची कागदपत्रे आणि दिलेली माहिती पडताळली जाणार आहे. फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी समाजकल्याण विभागाकडून कडक कारवाई केली जाईल.

लाभ मिळवण्यासाठी नवे नियम
योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष पाळणे आवश्यक असेल. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ मिळणार नाही. आयकर प्रमाणपत्र, निवृत्ती पेन्शन, वाहन मालकी, आणि जमीनधारणा यासारख्या माहितीची तपासणी होईल.
अर्जदारांच्या घरी जाऊन दिलेल्या माहितेची पडताळणी केली जाणार आहे.

या योजनेचा आतापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. मात्र, नियम तोडून अर्ज करणाऱ्यांचे अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या आणि अयोग्य माहिती देणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जाईल. सरकारचे उद्दिष्ट फक्त गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचवणे आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेतील