Arbaaz Khan : अरबाजने 56 व्या वर्षी केलं दुसरं लग्न, वडीला सलीम खान यांची धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हा गुन्हा…’

Arbaaz Khan : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानने नुकतेच दुसरे लग्न केले आहे. या अभिनेत्याने रविवारी एका इंटिमेट सोहळ्यात मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. दोघांचे लग्न अर्पिता खानच्या बंगल्यावर मोठ्या थाटामाटात पार पडले.

ज्यामध्ये सलमान खान, सोहेल खान, अरबाजचा मुलगा अरहान खान, आई-वडील सलीम आणि सलमा खान, त्याची भाची आणि पुतण्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, आता अरबाजचे वडील सलीम खान यांनी आपल्या मुलाच्या दुसऱ्या लग्नावर मौन तोडले आहे. ते म्हणाले जेव्हा अरबाजने लग्नाबद्दल सांगितल्यावर त्यांच मत काय होत. यासोबतच त्यांनी सांगितले की, पुन्हा लग्न करणे हा गुन्हा नाही.

वास्तविक सलीम खानने नुकतेच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. “मी त्यासाठी खूप आनंदी आहे आणि त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. मी अरबाज आणि शूराला माझे आशीर्वाद दिले आहेत आणि ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

सलीम खानला लग्नाबाबत काही चर्चा झाली का, असे विचारले असता सलीम खान म्हणाले की, मला वाटते या विषयावर चर्चा करू नये कारण यावर चर्चा करण्याची गरज नाही. ते स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहे आणि जर ते आनंदी असेल तर इतर काहीही महत्त्वाचे नाही.

त्याने फक्त मला सांगितले की तो लग्न करणार आहे आणि मी म्हणालो ते ठीक आहे. मला असे वाटते की आपण कोणाच्याही निर्णयाच्या आड येऊ नये किंवा त्यावर काहीही बोलू नये, कारण हस्तक्षेपामुळे समस्या निर्माण होतात.

अरबाज खान ‘पटना शुक्ला’च्या सेटवर शौराला पहिल्यांदा भेटला होता. येथूनच दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. जवळपास 9 महिने एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. शौराआधी अरबाज खानने मलायका अरोरासोबत लग्न केल्याची माहिती आहे.

त्यांना अरहान खान हा २१ वर्षांचा मुलगा आहे. 2017 मध्ये मलायकापासून घटस्फोट घेतल्यानंतर, अरबाजने जॉर्जिया एंड्रियानाला डेट करण्यास सुरुवात केली, ज्याने या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केली.