मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे काल अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. यामुळे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये युती करणारा माणूस गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. शरद पवार आणि आशीष शेलार यांचे जसे पक्षही वेगळे, तसेच मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये त्यांचे गटही वेगळे होते.
असे असताना या दोन दिग्गज नेत्यांना एकत्र आणण्यासाठी अमोल काळे यांनी यशस्वी प्रयत्न केले होते. अमोल काळे यांचे नुकतेच भारत आणि पाकिस्तान सामना अमेरिकेत लाइव्ह पाहिल्यावर काही वेळातच निधन झाले. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. शरद पवार यंच्यासमोर मुंबई क्रिकेट संघटनेच्या रिंगणात आशीष शेलार यांचे आव्हान असल्याचे मानले जात होते.
असे असले तरी या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे, असे अमोल काळे यांना वाटत होते. यामुळे त्यांनी याबाबत प्रयत्न केले होते. मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये अमोल काळे हे उपाध्यक्ष पदावर होते. पण ते जेव्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले, तेव्हा शरद पवार आणि आशीष शेलार हे दोघेही त्यांच्याबरोबर होते.
याचे कारण अमोल काळे होते. अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जात होते. त्यामुळे अमोल काळे यांना फडणवीस यांचा पूर्ण पाठिंबा होता. या सर्व नेत्यांच्या उपस्थितीचा परीणाम निवडणूकीच्या निकालावरही झाला. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, काळे यांच्याविरोधात भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे आव्हान होते. संदीप पाटील यांनी एक खेळाडू, प्रशिक्षक, निवड समिती अध्यक्ष म्हणून काम केले होते. याबाबतीत संदीप पाटील यांचे पारडे अमोल काळे यांच्यापेक्षा जड समजले जात होते. यामुळे चुरस होणार हे नक्की होतं.
असे असताना अमोल काळे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधली होती. मतदान करणाऱ्या सदस्यांनाही त्यांनी आपल्याला मतदार करण्याचे आवाहन केले होते. पण जेव्हा सर्वपक्षीय नेते अमोल यांच्या व्यासपीठावर जमले, तेव्हाच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी भूमिका घेतली होती.