महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का देत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षाचा हात धरला आहे. आज पाटील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षप्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपचा राजीनामा दिला.
याबाबत त्यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षात मी खूप काही शिकले, मी पक्षाची ऋणी आहे, असे सांगत सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते, त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे.
सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे चार वेळा खासदार आणि एकदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्या ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या. यानंतर त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्रीपदही भूषवले.
सूर्यकांता पाटील 1980 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. सूर्यकांता पाटील 1986 मध्ये काँग्रेसमधून राज्यसभेवर गेल्या, 1991, 1998 आणि 2004 मध्ये त्या तीनदा लोकसभेवर निवडून गेल्या.
दरम्यान, आता तब्बल दहा वर्षानंतर राष्ट्रवादीच्या माजी नेत्या सुर्यकांता पाटील यांनी पुन्हा शरद पवारांच्या नेृत्त्वाखाली राष्ट्र्वादीत घरवापसी केली आहे. २०१४ साली राष्ट्रवादीची साथ सोडून सूर्यकांता यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता.
आता दहावर्षानंतर पुन्हा भाजपाला सोडचिठ्ठी देत सुर्यकांता पाटीलांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता परतीचे दोर कापून मी राष्ट्रवादीत पुन्हा येते असे सुर्यकांता पाटील म्हणाल्या. यामुळे आता भाजपला मोठा धक्का बसला आहे.