मोठी बातमी! भाजपचे टार्गेट ४०० पार! आता शिवसेनेइतका जुना मित्र पुन्हा NDA मध्ये परतणार….

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ही निवडणूक काही दिवसांवर आली असून पक्षांचे कार्यक्रम जोरदार पद्धतीने सुरू आहेत. पक्षांतर तर युती आघाडी देखील केली जात आहे. लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षानं छोट्या पक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे.

बिहारमध्ये जनता दल युनायटेडला सोबत घेत भाजपने इंडिया आघाडीला धक्का दिला. यामुळे बिहारमध्ये भाजपची सत्ता आली. यानंतर आता भाजपने इतर राज्यात देखील अशीच तयारी सुरू केली आहे. भाजपने उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाबमध्ये प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्रात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यात युतीबद्दल चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. जास्तीत जास्त पक्षांना आपल्या सोबत घेण्याची भाजपची योजना आहे.

राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० आमदार भाजपसोबत गेले. त्यामुळे राज्यात भाजप सत्तेत आली. शिवसेनेनंतर भाजपचा दुसरा सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दल २०२० मध्ये भाजपची साथ सोडली. यानंतर भाजपने पुन्हा तयारी केली.

कृषी विधेयकांवरुन अकाली दलाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिरोमणी अकाली दल आणि भाजप १९९६ मध्ये सोबत आले. तब्बल २४ वर्षे या पक्षांची युती होती. २०२० मध्ये वेगळे झालेले पक्ष आता पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. यावरुन रायगडमधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपला आव्हान दिले. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या इंडिया आघाडीमधून देखील अनेक पक्ष बाहेर पडत आहेत.