सर्वात मोठी बातमी! अजित पवार आणि भाजपच बिनसलं! भाजपविरोधात ८ उमेदवारांची घोषणा, पहा यादी…

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपद मिळवले. यामुळे ते शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन भाजपात गेले. असे असताना आता पुन्हा एकदा त्यांचे भाजप सोबत खटकले असल्याचे सांगितले जात आहे.

याचे कारण म्हणजे अरुणाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये भाजप आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीने हवं उमेदवार उभे केले असल्याने चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी माजी आमदार लिखा साया यांनी पक्षाची राज्यातील सूत्रे स्वीकारली. साठ सदस्य असलेल्या या विधानसभेसाठी लोकसभेसोबतच निवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे अजित पवारांनी असा निर्णय का घेतला याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीत माजी आमदार लिखा साया यांच्यासह माजी मंत्री तिपांग तलोह हे देखील आहेत. लोमा गोल्लो (पाक्के केसांग), न्यासम जोंगसाम (चांगलांग उत्तर), न्गोलिन बोई, अजू चिजे (नामसांग), मोंलोग योम्सो (मारियांग गेकू) आणि सलमान मोंग्रे (चांगलांग दक्षिण) यांचा समावेश आहे.

दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्रात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे. तसेच महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार असे पक्ष आहेत.

यामुळे ही लोकसभा निवडणुक वेगळी ठरणार आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुढे येईल. अनेक पक्ष आणि नेते फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.