सोन्याच्या दरवाढीला ब्रेक! दरात 3300 रुपयांची घसरण, जाणून घ्या नवीन दर…

गेल्या काही दिवसांपासून सोने – चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. तसेच सोन्याच्या दरात झालेल्या या दरवाढीमुळे ऐन लग्नसराईत नागरिकांचं बजेट काहीसे कोलडमडले आहे. यामुळे मोठी पंचाईत झाली आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण कधी होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता.

असे असताना आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. सोने-चांदीच्या दरात घसरण सुरू झाली. उच्चांकी दर गाठलेल्या सोन्याच्या दरात आतापर्यंत ३३०० रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे आता सोने खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? सोन्याचे दर आणखी कमी होणार की वाढणार? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेकजण गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत असतात.

दरम्यान, केडिया ॲडव्हायजरीच्या मते, एप्रिल महिन्यात सोन्याचा दर ६८,६९९ रुपये प्रति १० ग्रॅमपासून सुरू झाला आणि याच महिन्यात सोन्याचा उच्चांकी दर ७३,९५८ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. तर सोन्याचा किमान दर ६८,०२१ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला. यामध्ये चढउतार होत होते.

यामध्ये एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात ३.९३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये भौगोलिक राजकीय तणावात वाढ, केंद्रीय बँकांकडून सोन्याच्या खरेदीत झालेली वाढ, जागतिक बाजारात सोन्याच्या मागणीत होणारी वाढ, सुरक्षित गुंतवणूक म्हणून नागरिक सोने-चांदीत गुंतवणूक करत आहेत.

तसेच लग्नसराई सुरू असल्याने सुद्धा सोने खरेदीत मोठी वाढ होत आहे. यामुळे दर कमी जास्त झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात हे दर वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.