देशासह राज्यात सध्या लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अद्याप सर्वच पक्षांकडून उमेवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा पेच अजून सुटलेला नाही. राज्यात भाजपने काही उमेदवार जाहीर केले आहेत.
आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली असून त्यात १७ नावांना मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असेही सांगितले जात आहे.
राहिलेल्या काही जागांवर अजून महाविकास आघाडीचे एकमत झाले नाही. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. यामध्ये विनोद घोसाळकर- उत्तर मुंबई, संजय दिना पाटील- मुंबई ईशान्य, अरविंद सावंत- दक्षिण मुंबई, अनिल देसाई- दक्षिण मध्य मुंबई, चंद्रकांत खैरे- छत्रपती संभाजी नगर, नरेंद्र खेडकर- बुलढाणा
संजय देशमुख- यवतमाळ, ओमराज निंबाळकर- उस्मानाबाद, बंडू जाधव- परभणी वाघचौरे- सिर्डी, विजय करंजकर- नाशिक, राजन विचारे-ठाणे, अनंत गिते- रायगड नागेश आष्टीकर- हिंगोली, विनायक राऊत- रत्नागिरी-सिंधुदुर्ग, चंद्रहास पाटील- सांगली, संजोग वाघेरे- मावळ
अशी नावे पुढे आली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यात सभांचा धडाका लावला असून काहीही करून भाजपला धडा शिकवला जाईल असेही सांगितले जात आहे.
सध्या प्रकाश आंबेडकर हे देखील महाविकास आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहत आहेत. यामुळे त्यांना किती जागा मिळणार ते महाविकास आघाडीत येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.