Buldhana Crime : मित्राच्या बायकोसोबत अनैतिक संबंध, जीवलग दोस्ताला शेतात नेलं अन् केलं भयानक कृत्य…

Buldhana Crime : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पळसखेड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मित्राचा जिवलग मित्रानेच काटा काढून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत माहिती अशी की, राजाराम गजानन जायभाये व संतोष मदन थोरवे हे मित्र होते. त्यामुळे संतोष यांचे राजारामच्या घरी जाणे-येणे होते. त्यातच राजारामच्या पत्नीसोबत संतोषची जवळीक वाढली होती. यातूनची ही घटना घडली आहे.

नंतर राजाराम जायभाये हा संतोष थोरवेच्या शेतात मृत अवस्थेत दिसून आला. राजाराम जायभाये यांनी शेतात आत्महत्या केल्याची वार्ता गावात पसरविण्यात आली. मात्र याबाबत तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

नंतर मृतकचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांनी लोणार पोलीस स्टेशनला मृतक राजारामची पत्नी व संतोष थोरवे यांच्या अनैतिक संबंधात राजाराम अडचण ठरत असल्याने संतोष थोरवे यांनीच राजारामचा खून केल्याची तक्रार दाखल केली. यामुळे घटनेचा उलगडा झाला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी संतोष मदन थोरवे याला अटक करून त्याच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घोगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांनी घटनेचा तपास केला.

लोणार पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपी संतोष थोरवे यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे सध्या याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली आहे.