समाजात प्रत्येकाचा डीएनए जसा वेगळा असतो. तसाच प्रत्येकाच्या बोटांचे ठसेही वेगळे असतात. हे फिंगरप्रिंट्स व्यक्तीला ओळखण्यासाठी खूप मदत करतात. आधार आणि पासपोर्टसह अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी बोटांचे ठसे आवश्यक आहेत.
आपली ओळख आणि सुरक्षिततेसाठी बोटांचे ठसे खूप महत्त्वाचे आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या बोटांचे ठसे बदलतात? याबाबत अनेकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खर तर मृत्यूनंतर शरीरातील विद्युत वाहकताही संपते आणि आपल्या पेशीही काम करणे बंद करतात.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या बोटांचे ठसे आता पूर्वीसारखे विश्वसनीय राहत नाहीत. मृत्यूनंतर शरीर ताठ होते. अशा स्थितीत आपली बोटेही शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे ताठ होतात. मृत्यूनंतर बोटांचे ठसे मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मृत्यूनंतर व्यक्तीच्या फिंगरप्रिंटमध्ये बदल होतात.
मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचा मोबाईल त्याच्या बोटांच्या ठशांचा वापर करून अनलॉक करता येत नाही. मोबाईल फोनचे सेन्सर मानवी बोटांमध्ये चालणाऱ्या विद्युत वाहकतेच्या आधारे काम करतात. मृत्यूच्या शरीरात असलेली विद्युत चालकता संपते.
त्यामुळे मोबाईल फोनचे सेन्सर विद्युत प्रवाहाशिवाय बोटे ओळखू शकत नाहीत. यामुळे आपण कोणाचा मोबाईल चालू करू शकत नाही. दरम्यान, मोबाईल आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक झाला आहे.
यामुळे सध्या लहान मुलांपासून ते वृद्धांकडे देखील मोबाईल बघतो. मोबाईल न दिल्याने अनेकांनी आपले आयुष्य संपवल्याच्या देखील बातम्या आपण बघितल्या असतील. यामुळे मोबाईलचे किती व्यसन आपल्या लागले आहे, हे यावरून दिसून येईल.