ताज्या बातम्यालाईफस्टाईल

Virender Sehwag : क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग पत्नीसोबत घेणार ग्रे डिव्होर्स, जाणून घ्या काय असतो ग्रे डिव्होर्स

Virender Sehwag : भारताचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्यातील नातेसंबंधांवरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सेहवाग आणि आरती ‘ग्रे डिव्होर्स’ घेणार असल्याच्या बातम्यांनी cricket चाहत्यांमध्ये खळबळ माजवली आहे. मात्र, याबाबत दोघांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सेहवाग आणि आरतीची प्रेमकहाणी

वीरेंद्र सेहवागला आरती पहिल्यांदा वयाच्या सातव्या वर्षी आवडली होती. तब्बल १४ वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले आणि घरच्यांचा विरोध झुगारत २००४ साली पळून जाऊन लग्न केले. या जोडप्याने २० वर्षांच्या संसारात अनेक चढ-उतार पाहिले. त्यांना दोन मुलं असून, त्यांचे कुटुंब क्रिकेटविश्वात आदर्श मानले जात होते.

ग्रे डिव्होर्स म्हणजे काय?

‘ग्रे डिव्होर्स’ हा शब्द अशा जोडप्यांसाठी वापरला जातो जे १५-२० वर्षांच्या दीर्घ सहजीवनानंतर किंवा ५० वर्षांच्या पुढे गेल्यानंतर घटस्फोट घेतात. याला ‘लेट लाइट डिव्होर्स’ किंवा ‘डायमंड डिव्होर्स’ असेही म्हणतात. अशा प्रकारच्या घटस्फोटात पती-पत्नीला मानसिक, भावनिक, आणि कधीकधी आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो.

सोशल मीडियावरील हालचालींनी चर्चेला अधिक वाचा

सेहवाग आणि आरती यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचे लक्षात आल्याने या चर्चांना अधिकच जोर आला आहे. यापूर्वी, युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्या नातेसंबंधांबाबतही अशा अफवा उठल्या होत्या.

अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

सध्या सेहवाग आणि आरती यांच्या नात्याबाबत केवळ अटकळ बांधल्या जात आहेत. या दोघांनीही अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र, त्यांच्या चाहत्यांनी या चर्चांमुळे चिंता व्यक्त केली असून, नात्यात सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

सेहवागसारख्या क्रिकेट जगतातील दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या या चर्चांनी क्रिकेटविश्व आणि चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

Related Articles

Back to top button