Crime News: चहाची तलफ तरूणाच्या जीवावर बेतली, घोट घेताच क्षणात सगळं संपल, नेमक घडल काय?

Crime News: मित्रानेच मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ही धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय.

झालं असं की, चहाच्या टपरीवर उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून तीन मित्रांनी मिळून चौथ्या मित्रावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव ईश्वर उर्फ मनीष भालधारे (वय २६) आहे. तो रामनगर तालुक्यातील कुडवा गावचा रहिवासी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मानकर, लोकेश मानकर, पवन मानकर, मोहित शेंडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी संतोष मानकर यांचे कुडवा येथे चहा नाश्त्याचे दुकान आहे. मृत ईश्वर हा संतोषचा मित्र होता. आरोपी संतोष मानकर यांनी ईश्वरकडून काही पैसे उधार घेतले होते. ईश्वर हा पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. यामुळे संतोष मानकर याचा संताप झाला होता.

दरम्यान, शनिवारी (६ जानेवारी) रात्री आरोपी संतोष मानकर आणि ईश्वर भालधारे यांच्यात चहाच्या टपरीवर पुन्हा उधारीच्या पैशांवरून वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात संतोष मानकर याने आपल्या मित्रांसोबत ईश्वरवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात ईश्वरचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, ईश्वरच्या हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली. रामनगर पोलिसांनी अवघ्या काही तासातच तीन आरोपींना अटक केली.

पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.