दादांचा डाव खडकवासल्यात फिरला, इंदापूर, दौंड वनसाईड, बारामतीत कोणाचा गेम? थेट निकालच आला समोर…

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदार संघात नुकतेच मतदान पार पडले. या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ५६.९७ टक्के मतदान झालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६४.५० टक्के मतदान झालं.

यामध्ये खडकवासल्यात ५० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. शरद पवार आणि पुतण्या अजित पवारांची गणितं कालच्या मतदानामुळे पूर्णपणे विस्कटली. यामुळे अजित पवार गटाची धाकधूक वाढली आहे. यामुळे निकाल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक मतदारसंख्या खडकवासल्यात आहे.

याठिकाणी भाजपचा आमदार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळेंविरोधात भाजपच्या कांचन कुल मैदानात होत्या. खडकवासल्यातून कुल यांना ७० हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती. यामुळे यावेळी देखील अजित पवारांनी याठिकाणी विशेष लक्ष दिले होते.

पण सुळेंनी बारामतीच्या जोरावर ही आघाडी कापून काढली. महायुतीत गेलेल्या अजित पवारांची भिस्त यंदा खडकवासल्यावर होती. पण खडकवासल्यात झालेलं कमी मतदान अजित पवारांची चिंता वाढवणारं आहे. याठिकाणी शरद पवार यांनी मोठी रणनीती आखली होती.

खडकवासल्यात यंदा कमळ चिन्हावरचा उमेदवार नसल्याने भाजपचा मतदार फारसा बाहेर पडला नाही. खडकवासल्यात अधिक लीड घ्यायचं आणि त्याच्या जोरावर निवडणुकीत बाजी मारायची, असा अजित पवारांचा डाव होता. पण असे दिसले नाही. फक्त बारामतीमध्येच अजित पवार यांना फायदा होईल, असे सांगितले जात आहे.

अजित पवार यांचा सुप्रिया सुळेंना बारामतीत ५०-५० वर रोखायचं. भोर, इंदापूर, पुरंदर, दौंडमध्ये सुळेंनी १० ते १२ हजार मतांचं लीड मिळवलंच तर खडकवाल्यातील भाजपच्या मतदारांच्या आधारे ते एकहाती कापायचं, अस गणित त्यांचं होतं. कमी कमी मतदानामुळे दादांचं गणित चुकलं.

खडकवासल्यात ६० टक्के मतदान झालं असतं तर अजित पवारांची चिंता मिटली असती. पण तसं घडलेलं नाही. खडकवासल्यातून अजित पवारांना ५० ते ६० हजारांचं मताधिक्क्य अपेक्षित होतं. मात्र आता दादांची चिंता वाढली असून सुप्रिया सुळे यांच्या गटात आनंदाचे वातावरण आहे.