Dharashiv News: लॉजवर भलताच प्रकार, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, धाड टाकताच सगळेच हादरले…

Dharashiv News: धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. याठिकाणी अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉजवर पोलिसांनी धाड टाकली आहे. यात चार महिलांची सुटका केली आहे.

या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. धाराशिव गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या घटनेची एकच चर्चा सुरू झाली आहे. पोलीस पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी गस्तीस होते.

याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक आणि व्यवस्थापक हॉटेलमध्ये महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करून घेत आहेत. यामुळे पोलिसांनी सापळा रचला.

एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन लॉजवर छापा टाकला असता लॉजमध्ये चार महिला आढळून आल्या. यामुळे मोठी पळापळ झाली. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस इतर धागेदोरे शोधत आहेत.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन तसेच मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलीस हवालदार अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे, हुसेन सय्यद यांनी पार पाडली.

दरम्यान, हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे (६३, रा. धाराशिव) दलाल बालाजी चंद्रकांत गवळी (२९, रा. धाराशिव) हे दोघे जण आणि लॉजचे मालक नितीन रोहीदास यांच्या सांगण्यावरुन त्या महिला असे करत असल्याचे समोर आले, याबाबत पोलीस तपास करत आहेत.