ब्रेकींग! एकनाथ शिंदे घेणार मोठा निर्णय, ‘या’ 3 वाचाळवीर मंत्र्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता

राज्यात नव्या सरकारची लवकरच स्थापना होणार असून महायुतीकडून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाला काही महत्त्वाची मंत्रिपदे मिळतील. मुख्यमंत्रीपद निश्चित झाल्यामुळे आता मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असून, नाराजी टाळण्यासाठी खात्यांच्या वाटपाबाबत गोपनीयता राखली जात आहे.

महायुतीतील घटकपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या गटातही मंत्रिपदांसाठी चढाओढ सुरू आहे. शपथविधीसाठी अवघे 36 तास उरले असल्याने शिवसेनेच्या नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे.

पक्षातील सात आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता असून, काही ज्येष्ठ नेत्यांना उद्या मुंबईत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल आणि अकार्यक्षम किंवा वादग्रस्त नेत्यांना डावलले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. अडीच हजारहून अधिक पोलीस कर्मचारी, 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 निरीक्षक आणि 150 उपनिरीक्षक सुरक्षेसाठी तैनात असतील.