जालना रोडवरील झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या एका अभियंत्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (६ डिसेंबर) पहाटे तीन वाजता घडली. चिकलठाणा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.
मयत अभियंता संतोष राजू पेड्डी (वय २८, रा. राज ज्योती नगर, उस्मानपुरा) हा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंपनीत वर्क फ्रॉम होम करत होता. घरातील सदस्य हैदराबादला लग्नासाठी गेल्याने संतोष घरी एकटाच होता. रात्री उशिरा काम आटोपल्यानंतर तो जेवणासाठी जालना रोडवर यशवंत हॉटेलमध्ये गेला होता.
हॉटेलमध्ये त्याच वेळी एका टोळक्याने जेवण मागण्यावरून कर्मचा फ्रीजमधून स्प्राईटची गद घातला. टोळक्याने तल्यावर पैसे मागितल्याने हा वाद आधक तीव्र झाला. याच वेळी संतोष पेड्डी फॉरच्युनर कारमधून उतरला. संतोषची शरीरयष्टी पाहून टोळक्याला तो हॉटेल मालकाचा माणूस असल्याचा गैरसमज झाला.
क्षणाचाही विचार न करता टोळक्याने संतोषवर हल्ला केला. संतोषच्या छातीत चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. संतोषला रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, पैठण तालुक्यातील जुने कासवन गावात चार वर्षांपूर्वी एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी अक्षय प्रकाश जाधव (वय २७, रा. माळवाडी, सोलनापूर शिवार) याला तिहेरी जन्मठेप व ४० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी दिलेल्या आदेशानुसार, दंडाची रक्कम मृताच्या वारसांना देण्यात येणार आ